Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

Continues below advertisement

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीची ही जागा बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर करत बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केलं. आकाश मोरे यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी थेट इशाराच दिला. तसेच, काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरूय असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, पार्थ यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांचे बंधू आमदार रोहित पवार  यांनीही सल्ला दिलाय. खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी पार्थ पवार यांचे चांगलेच कान टोचले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही पार्थ यांच्या प्रश्नावर स्मीतहास्य करत, नातवाला टोला लगावला. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनीही पार्थ यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली. आता, आमदार रोहित पवार यांनी देखील पार्थ यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola