Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र अनेक संघटनांनी विरोध करत मराठी भाषा शिवकण्यासाठी थोडा वेळ देण्याची मागणी केली. यानंतर प्रताप सरनाईक यांनी आता 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत चाकलांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. कायद्यानुसार रिक्षा टॅक्सी चालवतो का ते पाहिले जाणार आहे. जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र मराठी भाषेबाबत 15 ऑगस्टपर्यंत आकारणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य निर्णयाच्या या भूमिकेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात काल वरूणराज भिडे स्मृती पुरस्कार राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या मराठी शिकवण्यावर भाष्य केलं. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.