Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

Continues below advertisement

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  (Gyanesh Kumar)  यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या जवळपास 200 खासदारांसह दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं आहे. त्याचसोबत आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही धोक्यात आणली असून त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. 

मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांनी अडवलं. राहुल गांधी यांनी तब्बल 8 तास आकाशवाणी भवनवर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्रीच्या वेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola