मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
मुंबईतील पश्चिम रेल्वमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी रात्री आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा चाकू भोसकून खून (Murder news) करण्यात आला होता. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. मालाड (Malad news) रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता आरोपी ओंकार शिंदे (वय 27) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरुन आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला होता. या वादात ओंकारचा संताप हाताबाहेर गेल्याने त्याने आलोक सिंह यांच्या पोटात चाकू खुपसला होता. त्यानंतर ओंकार शिंदे हा फरार झाला होता.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला होात. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी ओंकार शिंदे याला वसई स्थानकातून (Vasai Railway station) ताब्यात घेण्यात आले. ओंकार शिंदे हा मालाड कुरार व्हिलेज इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. हा वाद इतका विकोपाला का गेला, याचे नेमके कारण कळू शकले नव्हते. फक्त धक्का लागल्याचा राग आल्याने ओंकार शिंदे याने इतके टोकाचे पाऊल उचलले का, हे आता तपासले जाईल. या चौकशीतून आता काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.