ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी दहा वाजता सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. अनेक ठिकाणचे निकालही हाती आले आहेत. सध्याच्या कलांनुसार, राज्यभरात भाजप आघाडीवर आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही जोरदार मुसंडी घेतली आहे.राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकींचं बिगुल वाजलं, त्यानंतर मतदान पार पडलं आणि आज निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाडच्या दासगाव जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे पुर्ण पॅनल विजयी, जिल्हा परिषदेसाठी मन्सुर ताज तर पंचायत समितीसाठी प्रेरणा सावंत आणि साबिरा पाचकर विजयी. पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू