Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या चार दिवसांआधी मोठी वाढ झाली होती.सोनं 1,70,000 रुपये, तर चांदी 2,95,000 रुपयांवर जाऊन पोहोचली असताना आज अचानक सोनं आणि चांदीचा दर कमी झाला आहे.गेल्या दोन दिवसात अचानक सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन सोने 1,60,000 रुपये आणि चांदी 2,26,000 हजार रुपयांच्या खाली आली आहे.शेअर बाजार कोसळला असताना, सोने चांदीचे दर हे नेहमीच वाढत असल्याचं पाहायला मिळते. यावेळी मात्र शेअर बाजारसह ,सोने-चांदीचे दर ही घसरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेला अपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाल्याने अमेरिकन फेडरल बँका आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.वाढत्या व्याज दराचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूक दर हे बँकेत गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याने मागणीत घट झाली आहे.ही घसरण झाल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहेत. मात्र पुढील काळात युद्धाची तीव्रता अधिक झाल्यास पुन्हा एकदा दर वाढ होण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.