Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं
शिवसेना ठाकरेंच्या (Shivsena UBT) पक्षातील खासदार फोडण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर (Operation Tiger) राबवले जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात ठाकरेंच्या पक्षातील ७ खासदार (Shivsena MP) गळाला लागल्याची दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीमुळे शिवसेना (ठाकरे गट)मध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही नेत्यांसह खासदार अरविंद शिंदे (Arvind Sawant) यांचंही नाव घेण्यात आलं आहे, यावरून अरविंद शिंदे (Arvind Sawant) यांनी संताप व्यक्त करत भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार असं ठामपणे म्हटलं आहे.
खासदार अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती. आज माझाही फोटो दिला. आमचं नशीब आहे की, अनिल देसाई यांचं नाव वगळलं आहे. या बातमीचा कडाडून निषेध करतो. देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं. तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलं आहे. गद्दारांच्या बाबतीत काय विचार आहे हे समजून घ्या अगोदर, असंही अरविंद शिंदेंनी म्हटलं आहे.