Anna Bansode On NCP : राष्ट्रवादीच्या विलीकरणाची तटकरे, पटेलांना कल्पना होती, बनसोडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

Anna Bansode On NCP : राष्ट्रवादीच्या विलीकरणाची तटकरे, पटेलांना कल्पना नव्हती? बनसोडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती, याची माहिती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना असावी. असा मोठा दावा विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित दादांचे विश्वासू अण्णा बनसोडेंनी केलाय. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हाती देण्यात कमालीची घाई सुरुये, मात्र मला याची कल्पना नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं. त्याचवेळी येत्या 12 फेब्रुवारीला अजित पवार आणि जयंत पाटील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा ही शरद पवारांनी केला. याबाबतची कल्पना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना असावी. असा मोठा दावा बनसोडेंनी केला. आजचा शपथविधी हा वरिष्ठांच्या आग्रहाने होत असल्याचं ही बनसोडेंनी नमूद केलं. शरद पवार आपले दैवत आहेत, त्यामुळं आपण पवार साहेबांशी चर्चा करुन पुढचे निर्णय घ्यायला हवेत का? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं बनसोडेंनी म्हटलं. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola