Anjali Bharti News : अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त

Anjali Bharti News :  अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीकडून दिलगिरी व्यक्त

भंडाराच्या अशोकनगर येथील भीम मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह, लज्जास्पद आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अंजली भारतीसह भीम मेळाव्याचे मुख्य आयोजक संदेश वासनिक या दोघांविरोधात भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल होताच अंजली भारती नॉट रीचेबल होत्या. मात्र, आता अंजली भारती यांनी या संपूर्ण प्रकरणातबाबत माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यात अंजली भारती यांनी.... महिलांच्या संरक्षणासाठी कायदे अपुरे पडत आहेत. त्यामुळं ठोस कायदा करावा किंवा अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी तरतूद करणारा कायदा करावा... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कायदा तयार करणे आहे त्यात कायदा सक्त करावा बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत माझ्या तोंडातून चुकीचे शब्द निघाले ते योग्य नाही, याची मला जाणीव झालेली आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.... मात्र माफीनामा मागत असतानाच महिलांचा सन्मान करणारी मी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर आहेत त्यामुळे महिला आणि अल्पवयीन मुलींवर लातूर मालेगाव सोबतच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होणाऱ्या अत्याचाराविरोधातही माझ्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ नवनीत राणा महिला आयोगाने त्यावेळीही तळमळ दाखवावी...असं या व्हिडिओ मधून अंजली भारती यांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola