Bank Privatization केंद्र सरकार देशातील चार बँकाचं खाजगीकरण करण्याच्या तयारीत, कोणत्या आहेत या बॅंक?
केंद्र सरकार देशातील आणखी चार बँकांना खासगी हातात सोपवण्याची जोरदार तयारी करत आहे. या संदर्भातील निर्देश पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सरकारी कर्ज पुरवठादारांची संख्या कमी करण्यासाठी सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या बरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कर संकलन कमी झाले आहे. त्यामुळे बँकेच्या खासगीकरणातुन सरकार पैसा उभा करू पहाते आहे.