Thane Lok Sabha : नवी मुंबईत संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज

Thane Lok Sabha : नवी मुंबईत संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज
ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देवून शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी भावना नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांचे साटंलोटं आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासमोर डमी उमेदवार उद्धव ठाकरेंनी डमी उमेदवार दिलाय. तर ठाण्यात राजन विचारे यांच्या समोर एकनाथ शिंदे यांनीही डमी उमेदवार दिला. असंही भाजप पदाधिकारी म्हणालेत. तर ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीय.  दरम्यान हे कार्यकर्ते मुंबईतील भाजप कार्यालयाकडे निघालेत. या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola