Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

Continues below advertisement

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तर या प्रकरणी राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी  आज माध्यमांसमोर येऊन त्यांच्यांसोबत घडलेली सर्व आपबिती सांगितली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांनी आमची फसवणूक केली, लग्नाआधी सांगितलेल्या सर्व गोष्टीवेगळ्या होत्या. लग्नानंतरचं पूर्ण चित्र वेगळं होतं. प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारिरीक भावनात्मक छळ असं गितेश आणि त्याच्या परिवाराकडून छळ करण्यात आला, सात वर्ष त्यांनी छळ करून माझा आणि माझ्या परिवाराचा घात केला आहे.

Girija Raut : आम्ही आंनदाने राहू असं वाटतं होतं, पण

पुढे त्या म्हणाल्या की, राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे एक मोठा परिवार असल्याने आणि मला नेहमी गितेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच तक्रार केली नव्हती, आज ना उद्या सगळं बदलेल या आशेवरती, आम्ही आंनदाने राहू असं वाटतं होतं, पण असं काही घडलं नाही, त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं घर फ्लॅट, पैसे वगैरे, जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे, त्याने जी माझी छळवणूक केली, प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेली शाब्दिक सुनावणी आणि मारहाण त्यांनी माझ्याबरोबर केली ते आता लपवण्यासाठी ते खोटं स्टेटमेंट देत आहेत, असंही गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola