SuperFast News : भारत-पाक युद्धाच्या सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 09 May 2025
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार...प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानी चौक्या होरपळल्या...पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताची जोरदार कारवाई...
पाकिस्तानातल्या कराची बंदरावर भारतीय नौदलाचा प्रतिहल्ला...८ ते १२ धमाक्यांनी कराची हादरलं...१९७१ नंतर कराची बंदरावर भारताची मोठी कारवाई...
भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष्य...साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं...लाहोर, रावळपिंडीवरही जोरदार हल्ले...
भारतातल्या १२ शहरांमध्ये पाकिस्तानची आगळीक...भारतानं पाकिस्तानचे ४५ मिसाईल आणि ६० ड्रोन पाडले...पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवला...
भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला मोठा दणका...पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली...दोन जेएफ १७ आणि एक एफ १६ विमानांचा वेध....
पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड...भारतावर हल्ल्याचा केला नकार...पत्रक काढून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचा कांगावा...
सांबा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं केला खात्मा... १० ते १२ दहशतवादी सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याच्या होते तयारीत...
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानला मोठा दणका...बलुचिस्तानमधल्या एक तृतीयांश भागावर ताबा मिळवल्याचा दावा...पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली १० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बातचीत...ऑपरेशन सिंदूरबद्दल दिली माहिती...अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबियाचा समावेश...
दहशवादाला पाठिंबा देणं बंद करा, अमेरिकनं पाकिस्तानला खडसावलं...तर इराणचे परराष्ट्रमंत्री सकाळी पाकिस्तानला जाणार...
पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेनं...लष्करप्रमुख आसिम मुनीरला ताब्यात घेतलं, देशद्रोहाचा खटला चालवणार...शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख होण्याची शक्यता
पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर...इम्रान खान यांना सोडण्याची मागणी...सोशल मीडियावर समर्थकांची मोठी मोहीम...
भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक...पाकिस्तानचे ८ हजारपेक्षा जास्त ट्विटर अकाऊंट बंद...पाकिस्तानच्या फेक न्यूज रोखण्यासाठी कारवाई...