Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
भोंदू अशोक खरातसारखाच आणखी एक भोंदू खरात पार्ट २ समोर आलाय. हा आहे सोलापुरातला मनोहर भोसले. त्याला बनायचं होतं शिक्षक पण तो झाला भोंदू बाबा... अशोक खरात सारखीच त्याच्या आश्रमातही अनेक राज्यकीय नेत्यांची आणि सेलिब्रिटींची गर्दी असायची पण त्याचा चांगलाच भांडाफोड झालाय... पाहुयात एक रिपोर्ट...
राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांसोबत फोटोसेशन करणारा हा आहे
अशोक खरात पार्ट - २ भोंदू मनोहर मामा...
भोंदू अशोक खरातचं प्रकरण महिनाभरापासून चर्चेत आलेलं असताना सोलापुरच्या
करमाळ्यातला या नव्या भोंदू बाबाचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आलाय...
आश्चर्य म्हणजे याला शिक्षक व्हायचं होतं...
पण डीएडची परीक्षा तो नापास झाला आणि त्यानं भोंदूगिरीला सुरूवात केली...
स्वत:ला बाळूमामाचा अवतार असल्याचं भासवून आजवर त्यानं अनेकांना लुटलंय...
मात्र असं असतानाही त्याच्याकडे येणाऱ्या श्रीमंत आणि राजकारणी भक्तांची काही कमी नाही.
एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी त्याच्या भोंदूगिरीची ही कथा आहे...
GFX IN -
HEADER - मनोहर मामा भोंदू बाबा कसा झाला?
- मनोहर भोसले मूळ इंदापुरच्या लासुरने गावचा
- बनायचं होतं गुरूजी पण झाला भोंदूबाबा
- डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर राज्य सोडलं
- काही दिवस बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकला
- मूळ गाव सोडून करमाळ्यात परतला
- उंदरगावात काका मावशीकडे आसरा घेतला
- लोकांचं भविष्य सांगायला सुरूवात केली
- भाकितं खरी ठरल्यानं लोकांचा विश्वास वाढला
- उंदरगावची सीमा ओलांडून महानगरात पोहोचला
- झोपडीतून थेट आलिशान आश्रमात बडदास्त
- राजकारण, सिनेकलाकार, उद्योजकांची गर्दी