Smriti Mandhana And Palash Marriage : स्मृती मानधना, पलाश अडकणार लग्नबंधनात, कोण- कोण लावणार हजेरी?

Smriti Mandhana And Palash Marriage : स्मृती मानधना, पलाश अडकणार लग्नबंधनात, कोण- कोण लावणार हजेरी? 
भारताची स्टार क्रिकेटर्स स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोजर आणि फिल्ममेकर पलाश मुच्छल (Palash Muchal) या दोघांच्या लग्नसमारंभाची सध्या एकच चर्चा आहे. स्टेडियममध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यापासून ते त्यांच्या लग्नापूर्वीचे समारंभ हळद, मेहेंदी आणि आता धमाल संगीत नाइटचे फोटो आणि video व्हायरल होत आहेत. स्मृती आणि पलाश हे 23 नोव्हेंबर म्हणजेच आज थाटामाटात लग्न करणार आहेत. काल या लग्न समारंभाची संगीत नाईट होती.  हे संगीत समारंभाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्मृती आणि पलाश यांच्या रोमँटिक नृत्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही ग्रुप डान्स करत धमाल उडवली. पलाश आणि स्मृती यांच्या हायप्रोफाईल लग्नाला चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola