Ratnagiri Unseasonal Rain | कोकणातील भातशेती धोक्यात, कापणीयोग्य पीक वाया जाण्याची भीती

Continues below advertisement
मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसला असताना, कोकणातील भातशेतीला वातावरणाच्या लहरीपणाचा परिणाम जाणवत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे कापणीयोग्य भातपीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळामुळे पीक कापता येत नाहीये. कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीला या वातावरण बदलाचा फटका बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे सत्तर हजार हेक्टरहून अधिक जमिनीवर भातशेतीची लागवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा आकडा पंचावन्न हजार हेक्टरच्या घरात आहे, तर रायगड जिल्ह्यात सत्तर हजार हेक्टरच्या आसपास भातशेती केली जाते. एकंदरीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख हेक्टरवर भातशेती केली गेली आहे. यापैकी साधारणपणे तीस ते चाळीस टक्के भातपीक आता कापणीयोग्य झाले आहे, परंतु पावसामुळे ते कापता येत नाहीये. त्यामुळे कापणीयोग्य झालेले पीक सध्या संकटात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola