Ratnagiri Refinery : बारसूमध्ये शेकडो पोलीस दाखल, माध्यम प्रतिनिधींना पोलिसांची दमदाटी
abp majha web team
Updated at:
25 Apr 2023 11:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसू रिफायनरीसाठी जमीन सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात होतेय.. या सर्वेक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न आंदोलनकांनी केला.. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला. आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. दरम्यान, आंदोलन स्थळावरून माध्यम प्रतिनिधींना देखील हटवण्यात आलं.