Special Report Chiplun School : ना मोबाईल नेटवर्क ना वर्ग सह्याद्रीच्या कुशीत भरते अनाथांची शाळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Chiplun School : ना मोबाईल नेटवर्क ना वर्ग सह्याद्रीच्या कुशीत भरते अनाथांची शाळा गेल्या 20 वर्षांपासून चिपळूण तालुक्यातील कोकणातील सह्याद्री डोंगराच्या कुशीत ही अनाथांची शाळा भरते.. ही शाळा नसून कुटूंबच आहे. या शाळेत प्रवेश करताच निरागस मुलांचे चेहरे दिसतात.. इथे १ ली ते ७ वी पर्यंत शाळा शिकवली जाते. 3 टप्प्यात वर्गवारी करून या मुलांना शिकवलं जातं. ही शाळाचं त्याचं विश्व आहे. इथेच उठणे झोपणे आणि पुन्हां स्वतःच स्वयंपाक करणे, आजूबाजूचा परिसर साफ करणे..इतर कामात मदत करणे. हेही ते करत असतात.. शाळेच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर हि मुले स्वतःचे जेवण,नास्टा,चहा,पाणी तापविणेभांडी धुण्यापासुन ते चुल पेटवण्यापर्यत स्वतः करतात..येथील डोंगराळ भागांत राहणारी आदिवासी,कातकरी धनगर आणि इतर अठरापगड जातीची मुलं शिक्षणाबरोबर प्रशिक्षण घेत खरे जीवन शिक्षण अनुभवतात . इथं शिकणाऱ्या संदीप निकमने आपल्या अनुभवावर पुस्तक लिहलंय.आधुनिक जगाच्या शर्यतीत आपण मागे पडू नये,जगाची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी प्रयोग भूमीत मुलांना संगणकाचे प्रशिक्षणही दिले जाते.याच बरोबर या मुलांना परिसरातील शेती,भात शेती लावणी विविध लघु उद्योग,सह्याद्रीच्या पायथ्याशी उभारलेले छोट्या प्रोजेक्टची माहिती दिली जाते.. मुलांच्या अंगी विविध कलागुण असल्याचे येथे निदर्शनास येते.. ही शाळा डोंगराळ भागांत सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने इथे मोबाईलचं नेटवर्कही नाही..आणि मुलांना मोबाईलचा छंदही नाही.. मात्र तरीही ही मुलं शिकतायेत आणि आनंदीही राहतात.. अशा शाळांना प्रशासनानेही थोडंसं लक्ष दिलं तर या विद्यार्थ्यांना अजून चांगलं जगता येईल हे नक्की