Konkan Railway Delays | Ganeshotsav साठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, वेळापत्रक कोलमडले

गणपती विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. अतिरिक्त गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर चांगलाच ताण आला आहे. गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत. एका गणेश भक्ताने सांगितले की, "रत्नागिरीला सांगितलेलं बाराचं टाइमिंग, दुपारी बाराचं यायला कणकवलीला। आता अडीच तीन वाजतील असं वाटतंय।" मुंबईतून मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावर गाड्या धावत आहेत. गणेश भक्तांचा प्रवास निर्धोक व्हावा यासाठी या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सध्याच्या घडीला विशेष गाड्या अडीच ते तीन तास उशिराने धावत आहेत. सकाळी धावणाऱ्या काही नियमित गाड्या देखील साधारणपणे दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. अमोल मोरे यांनी गणेश भक्तांसोबत संवाद साधला. कॅमेरामन महेबुब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola