Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Continues below advertisement

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून  राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात 22 ऑगस्टला छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांना पुण्यातील मांजरी येथे सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळे हिने एक निवेदन दिलं होतं. ते निवेदन देखील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनी निशा साबळे सहभागी झाली होती. तिनं आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले होते. निशा साबळेनं मांडलेल्या समस्यांसह राज्यात सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घ्यावी असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola