एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Shaniwar Wada Row: 'आम्हीच सरकार असल्याच्या थाटात वागू नये', Neelam Gorhe यांचा Medha Kulkarni यांना टोला
पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwar Wada) परिसरात काही महिलांनी नमाज पठण केल्यानंतर झालेल्या वादाने राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर भाजप खासदार (BJP MP) मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण केले, ज्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. "आपणच सरकार आहोत अशा थाटामध्ये कोणीही वागू नये," असा थेट इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी सामाजिक सलोखा बिघडवल्याबद्दल आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही, 'शनिवारवाडा हे तीर्थस्थान नाही,' असे म्हणत या शुद्धीकरणाच्या कृतीवर टीका केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारवाडा परिसरातील बंदोबस्त वाढवला असून, पुरातत्व विभागाने (ASI) दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुणे
Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pune Navle Bridge Accident Fire : पुण्यातील नवले पुलावर 3-4 गाड्यांचा अपघात, वाहनांना भीषण आग
Pune Navale Bridge Accident : पुणे नवले पुलावरचा अपघात नेमका कसा घडला? पोलीस अधिकारी म्हणाले...
Navale Bridge Accident Detail Report : पुणे नवले ब्रीज अपघाताची A to Z कहाणी : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























