Pune Railway Station Renaming | थोरल्या बाजीरावांच्या नावावरून वाद, मेधा कुलकर्णी भावूक
Continues below advertisement
पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीरावांचं नाव देण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. बालगंधर्व चौकात आक्षेपार्ह बॅनरबाजी झाली. 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा' असं फ्लेक्सवर लिहिण्यात आलं. भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. 'टीका करा, पण काहीतरी पातळी ठेवा' असं त्यांनी म्हटलं. महिलांविषयी बोलताना दिल्या जाणाऱ्या उपमांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement