Pune Accident : मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Porsche Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली असून पुणे अपघात प्रकरणी पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.
निलंबित करण्यात आलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप केले जात होते. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दिरंगाई करण्याला दोन अधिकाऱ्यांना निलंबित केcfलं आहे.