एक्स्प्लोर
Pune Child Rescue | पुण्यात 4 वर्षांची Bhavika एकटी घरात, Fireman Yogesh Chavan यांनी वाचवले प्राण
पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुजर निंबाळकरवाडी येथे एका 4 वर्षांच्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. Bhavika Chandane असे या मुलीचे नाव आहे. तिच्या आईने मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना Bhavika ला घरी एकटे ठेवून बाहेरून कुलूप लावले होते. त्यानंतर Bhavika खिडकीत आली आणि लोखंडी जाळीतून सज्जावर उतरली. तिला आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आले आणि तिने खिडकीचा गज धरून ठेवला. सोसायटीतील लोकांनी आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने अग्निशमन दलामध्ये Taandel पदावर असलेले Yogesh Chavan घरी होते. त्यांनी धावपळ करून आणि Bhavika च्या आईकडून चावी घेत तत्काळ मुलीला घराच्या आत घेतले. "दहा ते दहा एक मिनिटं तरी ती मुलगी स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी आकांतानं हे ओरडत होती आणि ते पाहिल्यानंतर मी स्वतः पळत जाऊन तिला रेस्क्यू केलेला," असे Yogesh Chavan यांनी सांगितले. Bhavika बराच वेळ लोखंडी गज पकडून होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. Yogesh Chavan यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला.
पुणे
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
PCMC BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये श्रेयवाद रंगला!निवडणूक प्रमुखांसमोर अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























