पिंपरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बनले 'मटणवाले चाचा', पोलीस नागरिकांशी कसे वागतात याची केली पाहणी
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मध्यरात्री पोलिस कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. यासाठी वेशांतर करून ते मुस्लिम व्यक्ती बनले. खाजगी वाहनातून रात्री 12 ते शहरात पाहणी साठी निघाले. हिंजवडी, वाकड आणि पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः तक्रारदार म्हणून गेले आणि दोन नाकेबंदीतून प्रवास ही केला. तब्बल चार तासाच्या पाहणीत काही पोलीस पास तर काही नापास झाले. जे नापास झालेत त्यांना मेमो दिला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
Continues below advertisement