Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
आधी रुग्णालयात बॉम्ब...आणि आता वसतीगृहात संशयास्पद बॉक्स....मंडळी पुण्यात हल्ली काय घडेल याचा नेम नाही...दोन दिवसांपूर्वी एका तरूणानं उपचाराचा खर्च उकळण्यासाठी रुग्णालयात बॉम्ब ठेवला...आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या वसतीगृहाबाहेर एक संशयास्पद बॉक्स सापडल्यानं पुन्हा खळबळ उडाली...पण त्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं?शोधकार्य संपलं...पण प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हा गिफ्टचा बॉक्स मुलींच्या वसतिगृहाबाहेर नेमका कोणी ठेवला?ज्या सरप्राईज गिफ्टमुळे वस्तीगृहातील मुलींची झोप उडाली आणि पोलिसांची धावपळ झाली....ते अखेर एका प्रेमवीराचे अतरंगी कारनामे असल्याचं उघड झाले...'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात....पण ते पोलिसांना आणि बॉम्ब शोधक पथकाला नाहक कामाला लावणारं असू शकतं....याचं उदाहरण पुणेकरांनी पाहिलं....या 'सरप्राईज'मुळे त्या प्रेयसीची वस्तीगृहात आणि प्रियकराची संपूर्ण पुण्यात 'चर्चा' मात्र नक्कीच झाली...पुण्याच्या हडपसरमधल्या एका रुग्णालयात बॉम्ब सापडल्यानं आधीचं खळबळ उडालेली होती. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये मुलींच्या वसतिगृहाबाहेर एक बॉक्स आढळला. या बॉक्समुळे पुन्हा एकदा बॉम्बची अफवा पसरली आणि पोलिसांसह बॉम्बशोधक पथक कामाला लागलं. पण तपासानंतर जे काही समोर आलं ते ऐकून हसावं की रडावं अशीचं काहीशी परिस्थिती झाली.... नेमकं काय घडलं पाहुयात....