Datta Sane | पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचं निधन झालं. दहा दिवस ते कोरोनाशी मुकाबला करत होते, आज (4 जुलै) सकाळी मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सानेंना सुरुवातीला कोरोनाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.
Continues below advertisement