Kasba Peth and Chinchwad Bypolls Election : चिंचवड, कसबा पेठ मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटवनिवडणूक
Kasba Peth and Chinchwad Bypolls Election : चिंचवड, कसबा पेठ मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटवनिवडणूक
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणारेय. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जांगावर पोटनिवडणूक होणारेय. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा भाऊ शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यची शक्यताय. अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते तर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास अपक्ष नाना काटे पुन्ह निवडणूक लढवण्याची शक्यताय. लक्ष्मण जगताप यांचे अजित पवार यांच्याशी नजीकचे संबंध होते. त्यामुळे अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य मिळू शकते. तर मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना भाजपने तिकीट दिलं नाही तर काँग्रेस रोहित टिळक यांना रिंगणात उतरवण्याची शक्यताय.