स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सुरक्षा हटवण्याची मागणी केली आहे. चाकणकर यांच्या जीवाला कोणताही धोका नसताना त्यांना Y+ सुरक्षा देण्यात येत आहे, हे चुकीचे असून राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असा जाधवांचा आरोप आहे. तसेच चाकणकर या त्यांच्या पोलिस सुरक्षेचा वापर सोशल मीडियावर रिल तयार करण्यासाठी करतात, अशीही टीका करण्यात आली आहे. जाधव म्हणाले की, अशा सुरक्षेचा गैरवापर थांबवून ती गरजूंना दिली पाहिजे आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर व्हावा.
Dhananjay Jadhav On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना सुरक्षिततेची गरज नाही,त्यांची सुरक्षा काढा
Dhananjay Jadhav On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना सुरक्षिततेची गरज नाही,त्यांची सुरक्षा काढा
Tags :
Rupali Chakankar Maharashtra State Commission For Women Dhananjay Jadhav Maharashtra Mahilya Aayog