Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्व मतदारांना मनापासून शुभेच्छा देतो.
* प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक वक्तव्ये झाली; मात्र आता ते सर्व मागे टाकून पुन्हा एकत्र काम करण्याची वेळ आली आहे.
* महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून आता विकासासाठी एकजुटीने काम करूया, असा संदेश यावेळी देण्यात आला.
* उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. प्रचारात काही वक्तव्ये झाली असतील, पण सध्या ते सरकारमधील मित्र पक्ष आहेत आणि एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
* चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांनाही चंद्रकांत पाटील यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
* लवकरच रवींद्र धंगेकर यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
* सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.