Atul Londhe on Ravi Rana : रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अतुल लोंढेंची मागणी
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtul Londhe on Ravi Rana : आमदार बच्चू क़डू आणि रवी राणा यांच्या वादात आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी उडी घेतलीय. आमदारा रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी अतुल लोंढेंनी केलीय. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीत पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू य़ांनी 1 नोव्हेंबरपर्यंत केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचा इशारा राणांना दिला होता. आता अतुल लोंढे यांनी आरोपांची चौकशी करण्याची मागणी केलीय.