Coronavirus Updates | पुण्यातील एकाच कंपनीत 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ
Continues below advertisement
देश-विदेशातील नामवंत कंपन्या विस्तारलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ऑटोमोटिव्ह सीटिंग आणि ई-सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली. नुकतंच एका कर्मचाऱ्याचा कोविड अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खाजगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. त्यापैकी आणखी अहवाल प्रतीक्षेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने कंपनीने कोरोनाच्या उपाययोजनांचं उल्लंघन केल्याचं प्रशासनाच्या तपासात समोर आलं आहे.
Continues below advertisement