Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे

Continues below advertisement

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे

राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 19 एप्रिल रोजी राज्यात मतदान झालं. बारामती आणि राहुरी मतदारसंघात झालेल्या या मतदानानंतर आता 4 मे रोजीच्या निकालात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयी मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरुद्ध महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला नव्हता, तर राहुरीतही भाजप महायुतीच्या अक्षय कर्डिले यांच्याविरोधात महाविकास आघाडीची ठोस भूमिका दिसून आली नाही. त्यामुळे, हे दोन्ही विजय निश्चित मानले जात आहेत. त्यातच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा रेकॉर्ड करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्र्‍यांसह सर्वांनीच केले होते. आता, युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचं मताधिक्य सांगितलं आहे.  युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पाणी प्रश्नांच्या संदर्भात पत्रकार परिषद घेत पुरंदर उपसा सिंचन आणि जाणाई शिरसाईचे पाणी बारामतीतील जिरायती पट्ट्याला मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील होतो, आपल्या प्रयत्नांना यश आलेला आहे, अशी माहिती दिली. यावेळी, राजकीय प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्राँग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात 2 लाख 24 हजार मतदान झालं आहे, त्यापैकी दोन लाख वीस हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. तसेच, पवार विरुद्ध पवार हे व्हायलाच नको, असे म्हणत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola