Maharashtra विद्यार्थी योजनेचा गैरफायदा कोट्यवधींचा गैरव्यवहार, माझाच्या एन्व्हेस्टिगेशनमध्ये वास्तव

Continues below advertisement
श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची योजना आहे. बहुजन कल्याण मंत्रालयाकडून धनगर समाजातील गोरगरीब मुलामुलींसाठी ही योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षणाची सोय आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, एबीपी माझाच्या इन्वेस्टिगेशन रिपोर्टमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये उकळण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आणि वसतिगृह केवळ कागदावरच अस्तित्वात आहेत. असे असूनही, काही शिक्षण संस्थांकडून त्यांच्या नावाने पैसे लाटण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे खाते ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या मंत्री अतुल सावेंच्या छत्रपती संभाजीनगरातूनच काही प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. गरजू विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नसून, कागदोपत्री नोंदींच्या आधारे निधीचा अपहार करण्यात आला आहे. या गंभीर प्रकारामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola