Voter List Row: 'विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणू', CM Fadnavis यांचा थेट इशारा!

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात मतदार यादीतील (Voter List) कथित घोळावरून वाद पेटला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. 'मतदार याद्यांमधील घोळाचा लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना जो लाभ झालेला आहे, त्यामागचं सत्य आम्ही पुराव्यांसह जनतेसमोर आणू', असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे वक्तव्य केले. मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी, ही आपलीही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, केवळ पराभवाच्या भीतीमुळे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी विरोधक मतदार याद्यांचा मुद्दा पुढे करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. लवकरच पुराव्यानिशी गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola