Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानात
सांगली : लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. त्यातूनच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना (Tasgaon Kavathe Mahankal Assembly constituency) केलं आहे. शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.
आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.