Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
पंढरपूर: पंढरपूर शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते झेडपी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरू लागल्याने मतदानाला आलेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyashil Mohite Patil) यांनी पोलिसांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले. भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून खासदार मोहिते पाटील (MP Dhairyashil Mohite Patil)चांगले संतापल्याचे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी शंभर मीटरच्या परिसरात करणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतला आक्षेप
ग्रामीण भागात लॅपटॉप व छोट्या मशीनद्वारे मतदारांचे वेगवेगळे संशयास्पद सर्वे केले जात असल्याचा आक्षेपही खासदार मोहिते पाटील यांनी घेतला आहे. माळशिरस तालुक्यात अशा पद्धतीने लहान मशीन घेऊन मतदारांचे मतदाना दिवशी सर्वे सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोहिते पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. (MP Dhairyashil Mohite Patil)
नेमकं काय म्हणालेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील
तुम्ही पाहिलं तर हा 100 मीटरचा परिसर आहे आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे. भाजपचे अकलूज नगरपालिका हद्दीतील लोकांचा या मतदार केंद्राशी काही संबंध नाही, कायदा कसा धाब्यावर बसवावा, कायद्याची आणि सत्तेचा गैरवापर कसा करावा, अशी दहशत निर्माण करण्यासाठी अकलूज शहराध्यक्ष येथे येऊन थांबले आहेत. शंभर मीटरच्या हद्दीत जिल्हा कार्यकारणी सदस्य येथे आलेले आहेत. पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई त्यांच्यावर करत नाहीये. वास्तविक ते इथले मतदारच नाहीत. त्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत येथे दहशत पसरवण्याचा संबंध येत नाही. पण ते इथे का आलेले आहेत. ते मला समजत नाही. जर स्वतःवर इतका कॉन्फिडन्स असेल तर घरी बसून सगळं बघावं त्यांनी असंही पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.
























