Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी महायुतीवर घणाघाती आरोप केले आहेत. "एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे म्हटले जाते, मग ते नक्की कोणत्या कारणासाठी जातील? हे स्पष्ट व्हायला हवे," असे राऊत म्हणाले. भाजपचेच नेते गणेश नाईक म्हणतात की शिंदेंकडे 'हरामाचा पैसा' आहे आणि तो ते वाटत आहेत; मग नाईकांनी हे सत्य उघडपणे जगासमोर मांडावे, असे जाहीर आव्हान राऊतांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तेचा वापर करून केवळ एकमेकांना ब्लॅकमेल करणे आणि स्वार्थ साधणे सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याचवेळी त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. "सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना अजित पवारांनी अर्धवट माहिती देऊ नये, पूर्ण सत्य सांगावे," असा टोला त्यांनी लगावला. राजकारणाची ही पातळी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.