एक्स्प्लोर
Pune Politics: 'CM Race मधलेच माझ्याविरोधात...', धंगेकरांचा रोख थेट मोहोळांवर?
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) प्रकरणावरून महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पेटला आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला आहे. '२०२४ ला मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये (CM Race) येणारेच आता माझ्याविरोधात बातम्या पेरत आहेत,' असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला. 'जैन युवकांसाठी शिक्षणाचे दरवाजे बंद होत असतील तर त्यावर बोलणारच, काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार,' असे म्हणत धंगेकर यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या वादामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















