Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
ऑन नरेंद्र मोदी व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्या देशाच नेतृत्व अशा जबाबदार आणि सुसंकृत माणसाकडे आहे. मोदी आणि त्यांच्या आईवर टीका केली तरी मनाचा मोठेपणा दाखवलाय. हे क्वचितच असेल. पंतप्रधानानी एक आदर्श घालून दिलाय मला त्यांचा अभिमान वाटतो.
ऑन संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंकृतपना काय असतो हे दाखवलं, संजय राऊत यांचे मालक जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा कोरोना काळात असंख्य लोकांचा जीव गेले, पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस टाकल्या. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती. पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला अपेक्षा नाही. हा संस्काराचा विषय असतो. संजय राऊत यांनी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन सुसंस्कृत पणाचे सल्ले द्यावेत
ऑन संजय राऊत ( अमित शहा तडीपार गुंड)
संजय राऊत ४२० आहे हे आम्हाला म्हणावं लागेल. पत्रा चाळ प्रकरणी जो जेल मध्ये जाऊन आलाय तो ४२०च आहे. आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही. खिचडी मध्ये पैसे खाणाऱ्या ४२० ने आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये.
ऑन परीक्षा विधेयक
नीट बाबत जो प्रकार घडला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शब्द दिलाय असा प्रकार परत देशात होणार नाही. आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कापतील असा आदर्श बोलण्यापलीकडे कृतीतून दाखवण्याचं काम केले. त्यावर आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी शिक्कामोर्तब केलाय.
ऑन काँग्रेस आणि वंचित आंदोलन ( अमित शहा )
कारण ते रस्त्यावरचे लोक आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरल पाहिजे होत. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम अमित शहानी केले. म्हणून आपण सुरक्षित आहोत. रस्त्यावर उतरून फुलांचा हार अमित शहा यांना घातला पाहिजे तुम्ही राजकीय नेते नंतर अगोदर तुम्ही घरात सुरक्षित आहात त्याला कारण देशाचा गृहमंत्री कणखर आहे.