Hemant Godse On Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे आग्रही : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिक मतदारसंघ सत्ताधारी महायुतीतल्या कोणत्या पक्षाला मिळणार? तसंच या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, याचा फैसला अजूनही झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. नाशिक मतदारसंघ ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटलं आहे. हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळावा, असा आग्रह आम्ही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही धरला असल्याचं गोडसेंनी सांगितलं. तसंच नाशिकबाबत जो काही निर्णय आहे, तो मुख्य नेते एकनाथ शिंदेच घेतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महायुतीत निर्माण झालेला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. येत्या दोन दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, असा विश्वास कल्याणचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.