CM Eknath Shinde यांच्याकडून जानेवारीत महापालिका निवडणुकीचे संकेत : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (BMC Election) कधी होणार असा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे. या निवडणुकीबाबत राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेसाठी निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तर मुंबई पालिकेची निवडणूक कधी होणार हे फक्त देव आणि न्यायालय यांनांच माहित असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Continues below advertisement