Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?

Continues below advertisement

Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?

 मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल गाजावाजा करत सुरू केलेलं उपोषण अवघ्या १४ तासांत मागे घेतलंय... त्यांना १२ आश्वासनांचा ड्राफ्ट सरकार दिल्यानंतर जरांगेंनी आपलं आंदोलन गुंडाळलंय... मात्र या आंदोलनामुळे पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा वाद रंगण्याची चिन्हं आहेत... जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यासाठी ओबीसी आरक्षणावर गदा आल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय... रणरणत्या उन्हात सुरू झालेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण रात्रीच्या अंधारात सुटलं...शुक्रवारची चर्चा फिस्कटल्यानंतर शनिवारी सकाळपासून जरांगे उपोषणाला बसले... मात्र मुंबईपासून आंतरवली सराटीपर्यंत निरोपांची देवाणघेवणा सुरू होती... अखेर सरकारचा १२ कलमी मसुदा घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उपोषणस्थळी दाखल झाले... तिथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही दिली... जरांगेंच्या मागण्या पूर्ण करताना सरकारनं आपल्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणी ओबीसी नेते करतायत... नेमकं काय घडलं, बघुयात...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola