Pankaja Munde : विमान-हेलिकॉप्टरने प्रवास करते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते

Pankaja Munde : विमान-हेलिकॉप्टरने प्रवास करते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते
मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ------------  छत्रपती संभाजीनगरहुन उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचे निष्पन्न ------ जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर -------------- हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सभांच्या वेळा पुढे ढकलल्या ------------------- दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा सभांना हजेरी लावणार ----------- कालच पंकजा छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं...

Pankaja Munde  छत्रपती संभाजीनगर : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें (Pankaja Munde) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक (Helicopter) बिघाड झाल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगरहुन उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झालंय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे (Pankaja Munde) लातूर दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि संभाव्य सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणावर स्वतः पंकजा मुंडेंनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताचा संदर्भ दे प्रतिक्रिया दिलीय.

Pankaja Munde : त्यावेळी 'त्या' विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना

यावेळी पंकजा मुंडें म्हणाल्या कि, मी सकाळी साडे दहा वाजता निघणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेक ऑफ होणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे का हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला काही तसे वाटले होते, हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे सांगण्यात आले. मात्र जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडें यांनी दिलीय.

माझा स्वभाव खोलात जाऊन विचार करण्याचा आहे आणि त्या घटनेने आमच्या कुटुंबातील सर्व व्यथित आहेत. नवीन नवीन मलाही भीती वाटेल कि माझ्या हेलिकॉप्टरला काय झाले, पण आता असे वाटणे स्वाभाविक आहे, त्याला पर्याय नाही प्रत्येकाला काम आणि कर्तव्य करावे लागते, असेही पंकजा मुंडें म्हणाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola