Devendra Fadnavis vs Thackeray : ठाकरे बंधूंना फडणवीसांचा सवाल, विरोधकांचे प्रत्युत्तर

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना बॉम्बे स्कॉटिशसारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकवून भारतीय भाषांचा अपमान का करता, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आता ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी "देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा जीआर काढा" अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपाचे नेते कोणत्या शाळेत शिकले, असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेने विचारला आहे. राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत टाकणार का, असा प्रश्न अजितदाद्यांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. बॉम्बे स्कॉटिश ही महाराष्ट्रातीलच शाळा असून राज्य सरकारने तिला परवानगी दिली आहे. इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हे आम्ही सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले होते. इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हे हास्यास्पद असल्याचे मत व्यक्त झाले. निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून व्यक्त केली जात आहे. दिल्लीवरून आलेला आदेश राबवता न आल्याने काही नेत्यांचा ईगो दुखावल्याचे आणि त्यामुळे सरकार काहीतरी बोलून जात असल्याचे मत व्यक्त झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola