राज्यपाल कोश्यारींवर राज्य सरकारचा हल्लाबोल, Nanded, Hingoli, Parbhani दौऱ्यावर मंत्रीमंडळात नाराजी
राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारचे वाद सुरु आहेत. राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे अनेकदा आरोप महाविकास आघाडीतील सरकारने केले आहेत. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिकांनी आक्षेप घेतला आहे. असे दौरे, उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या बैठका हे राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचं मलिकांनी म्हटलंय. राज्यपाल कधीकाळी मुख्यमंत्री होते. मात्र, आता ते राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री नाही, हे ते विसरले आहे का? असा खोचक प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.