Maharashtra Assembly| विधानसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सभागृह तहकूब
आज विधानसभेत विरोधकांनी सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर तीव्र आक्रमक पवित्रा घेतला. दोनशे त्र्याण्णव अन्वये राज्याच्या विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. मात्र, शिंदेंनी सर्वसमावेशक उत्तर न दिल्याने भास्कर जाधवांनी बोलण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी त्यांना बोलण्यास परवानगी नाकारल्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले. भास्कर जाधवांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांनी त्यांना नियमाप्रमाणे आपली चूक दाखवून देण्यास सांगितले. त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी हातवारे केल्याने सत्ताधारीदेखील आक्रमक झाले. या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केले. अध्यक्षांनी स्पष्ट केले की, "राईट टू रिप्लाई जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाई असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाई देऊ शकत नाही." या घटनेमुळे विधानसभेतील कामकाज विस्कळीत झाले.