Kolhapur Zilla Parishad Elections | महायुतीला 'इच्छुक' डोकेदुखी, 10/10 आमदार असूनही पेच!

Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला दहा पैकी दहा जागांवर यश मिळाले. यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. हीच गर्दी महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाने जागा वाटपामध्ये आम्हालाच सर्वाधिक वाटा मिळावा अशी भूमिका घेतली आहे. भाजपाचे नेते Chandrakant Dada Patil यांनी 'जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील' अशी भूमिका घेतली आहे. तर Hasan Mushrif यांनी 'जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार' असल्याचे म्हटले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. दहा पैकी दहा आमदार आणि दोन खासदार असूनही इच्छुकांना तिकीट कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न नेत्यांसमोर उभा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola