India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन

Continues below advertisement


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी आज इंडिया आघाडीचा लोकशाही वाचवा मोर्चा होणार आहे..सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे..  मोर्चात दिल्लीतील इंडिया आघाडीचे 19 विरोधी पक्षांचे खासदार सहभागी होणार आहेत.. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत सुमारे 3 किमी पायी हा मोर्चा असेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी. आणि ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात. या इंडिया आघाडीच्या प्रमुख मागण्या आहेत.
 महाराष्ट्रातून संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे खासदार उपस्थित राहणार आहे. काँग्रेसने डीएमकेलाही आमंत्रित केल्याची सूत्रांची माहिती आहे.. डीएमकेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये.. याआधीच्या इंडिया आघाडीच्या बैठकांना डीएमकेने गैरहजेरी लावलीये त्यामुळे डीएमके काय भुमिका घेणार हे पहाणं महत्वाचं असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola