Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
पवार कुटुंबामध्ये विलीनीकरणाची चर्चा झाली असेल. सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान...! सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल - सुनील शेळके ऍंकर : दिवंगत अजित दादांचं पवार कुटुंबात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, हे आम्ही नाकारत नाही. सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर माझा पाठिंबा असेल. असं मोठं विधान अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय. शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी येत्या 12 तारखेला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं, त्यानंतर शेळकेंनी अजित दादांची पवार कुटुंब आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, हे आम्ही कधीचं नाकारलं नाही. असं मोठं विधान शेळकेंनी केलंय. तसेच सुनेत्रा वहिनी जे ठरवतील ते, त्यांनी म्हटलं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला माझा पाठिंबा असेल. असं शेळकेंनी जाहीरपणे म्हटलंय. पण शरद पवार राष्ट्रवादीचा प्रस्ताव काय आहे हे आधी पहावं लागेल आणि त्यानंतर भाजपसह शिंदे शिवसेनेची याला संमती लागेल, असं ही ते म्हणालेत.























